ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?

AdMob Advertisement Space

ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे फक्त उच्च जोखीम आणि सट्टेबाजी असा समज सर्वत्र पसरलेला आहे. यामुळे अनेकवेळा हुशार असणारे शिस्तबद्ध ट्रेडिंग करणारे गुंतवणूकदार देखील ऑप्शन ट्रेडिंगपासून लांब राहणे पसंत करतात. तथापि, या गैरसमजाच्या पलीकडे जाऊन वस्तुस्थिती पाहिल्यास, असे निदर्शनास येते की, ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक अजिबात नाही.

हे सत्य आहे की, ऑप्शन ट्रेडिंगचा मूळ हेतू जोखीम कमी करणे हा असायला हवा, परंतु अज्ञान आणि योग्य शिक्षणाचा अभाव हे घटक प्रत्यक्षात ऑप्शन ट्रेडिंग मधील जोखीम वाढविण्याचे काम करतात. वस्तुस्थितीमध्ये ऑप्शन्स हे तुम्हाला पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापनाची रचना तयार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त देखील ठरते.

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ इच्छितो की, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जोखीम कमी करण्यासाठी अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. जे तुम्हाला बाजारातील संभाव्य धोक्यांपासून संरक्षित करतील.

Table of Contents

    ऑप्शन ट्रेडिंग मधील पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापनाचे सुरक्षाकवच.

    Key Takeaways:

    • ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पूर्वनियोजित एक्सिट पॉईंट्स ठरलेले असतात, हेच तुमचे सर्वात मजबूत कवच आहे. यामुळे बाजारातील होणाऱ्या अनपेक्षित हालचाली तुमच्या नफ्यावर किंवा नुकसानीवर धक्कादायकपणे परिणाम करत नाहीत.
    • पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापनामुळे ट्रेड मध्ये एंट्री करण्यापूर्वी तुमच्या रणनीतीच्या संभाव्य परिणामांचे चित्र तयार होत असते. अर्थात हेच कवच तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यापासून रोखते.

    ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापन म्हणजे ट्रेड करण्यापूर्वीच जोखीमीची निश्चिती करणे होय. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये नफा कामविण्यापेक्षा देखील भांडवलाचे रक्षण करणे महत्वाचे ठरते. यामध्ये पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापन हेच गुंतवणूकदारांना बाजारातील चढ उतारापासून संरक्षण देते.

    कोणत्याही ट्रेडची सुरुवात करण्यापूर्वी संभाव्य नुकसानाची सीमारेषा निश्चित करणे, तसेच नफा आणि तोट्याचे गुणोत्तर ठरविणे या रणनीतींचा समावेश पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापनामध्ये होतो. अनेक ट्रेडर्स भावनिक निर्णय घेऊन ट्रेड करतात, यामध्ये त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, यासाठी आपल्या ट्रेडच्या संभावित नुकसानाची मर्यादा निश्चित करणे आवश्यकच असते.

    अनेक ट्रेडर्स हे गुंतवलेल्या भांडवलाच्या 1 किंवा 2% एवढी जोखीम मर्यादा ठेवतात, यामुळे बाजार विपरीत दिशेला गेला तरीही भांडवलाचा मोठा भाग सुरक्षित राहतो. अर्थात ऑप्शन ट्रेडिंग नफा कमविण्यासाठी मध्ये दीर्घकाळ सुरक्षित राहणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते.

    पूर्वनियोजित जोखीम नक्की काय असते?

    पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापन म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग सारख्या अस्थिर बाजारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपले संभावित नुकसान कसे मर्यादित राहील याची याच्या अचूक रुपरेषेची निश्चिती करणे. येथे बाजाराच्या अस्थिरतेवर मात करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने जोखीम व्यवस्थापित केली जाते.

    ऑप्शन ट्रेडिंग मध्ये भावनिक निर्णयांना बाजूला ठेऊन, प्रवेशाच्या आधीच एन्ट्री प्लॅन आणि एक्सिट प्लॅन तयार असायला हवा. कारण गतिशील बाजारामध्ये फक्त एकाच चुकीमुळे संपूर्ण भांडवल धोक्यात येऊ शकते, आणि त्यावेळी सावरण्यासाठी किंवा एखादी रणनीती कृतीत आणण्यासाठी वेळ देखील मिळत नाही.

    पूर्वनियोजित आणि अनियोजित जोखीम व्यवस्थापनातील फरक.

    पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापन ही एक सक्रिय स्वरूपाची रणनीती आहे. जेथे व्यवहारापूर्वीच नुकसानाची मर्यादा ठरविली जाते. यामध्ये स्टॉप लॉस ऑर्डर, पोझिशन सायझिंग, नफा तोटा गुणोत्तर यांचा सामान्यपणे समावेश होतो.

    अनियोजित जोखीम व्यवस्थापन हे सामान्यतः प्रतिक्रियात्मक स्वरूपाची रणनीती आहे. जेथे नफा किंवा तोटा सुरु झाल्यानंतर रणनीतींची अंमलबजावणी केली जाते. जेंव्हा मार्केटमध्ये नफा किंवा नुकसान होऊ लागते, त्यावेळी घाईघाईत स्टॉप लॉस किंवा टार्गेट कार्यान्वित करणे असे प्रकार या व्यवस्थापन प्रणालीमध्ये केले जातात.

    यापेक्षाही अधिक स्पष्ट फरक आपल्याला खालील दिलेल्या टेबल मध्ये तुलनात्मक पद्धतीने समजून घेता येतील.

    तुलना पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापन अनियोजित जोखीम व्यवस्थापन
    वेळेची निवड ट्रेड सुरू करण्यापूर्वीच जोखीम रणनीती ठरविली जाते. नुकसान किंवा नफा होऊ लागल्यावर किंवा मार्केटमध्ये होणाऱ्या चढ उताराच्या अनुषंगाने घाईत निर्णय घेतले जातात.
    अवलंबित्व घडामोडी, विश्लेषण आणि ऐतिहासिक डेटा वर अवलंबून निर्णय. बाजारामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर अवलंबून निर्णय.
    आधार मार्केटच्या हालचालींनुसार तर्क आणि गणितीय दृष्टिकोन यांच्यावर आधारित. भावनिक निर्णय, भीती किंवा लोभ या मानसिकतेवर आधारित.
    अंमलबजावणीची पद्धत स्टॉप लॉस, हेजिंग आणि पोझिशन सायझिंग रणनीती वापरल्या जातात. तात्काळ रिॲक्शन आणि बाजारातील बदलांवर भर दिला जातो.
    संरक्षण जोखीम आधीच निश्चित असते, त्यामुळे भांडवलाला संरक्षण मिळते. परिस्थितीत नुसार जोखीम व्यवस्थापित केली जाते, त्यामुळे भांडवल सुरक्षित राहील याची गॅरंटी नाही.
    ट्रेडिंग निर्णय शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निर्णय घेतले जातात. त्यामुळे अंमलबजावणी स्थिर असते. तणावाखाली किंवा गोंधळात निर्णय घेतले जातात, त्यामुळे अनेकवेळा नुकसान होते.
    ट्रेडमधील भूमिका ट्रेडर हा नियमानुसार मार्केटला प्रतिसाद देतो आणि ट्रेड नियंत्रित करतो. ट्रेडर हा बाजाराच्या हालचालीवर भावनिक प्रतिक्रिया देतो.
    आणखी पहा
    ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?
    ऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.

    पूर्वनियोजित जोखमीचे प्रकार

    ऑप्शन ट्रेडिंग मध्ये अमर्यादित नफ्याची क्षमता असून देखील यशस्वी ट्रेडर्स हे एंट्री आणि एक्सिट पॉइंटला नियोजनबद्ध का ठेवतात? अर्थात याचे उत्तर फक्त एकच आहे, आणि ते म्हणजे यशस्वी ट्रेडर्स हे पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापनास असाधारण महत्व देतात.

    शेअर बाजारामधील ऑप्शन ट्रेडिंग या आर्थिक साधनांकडे सामान्य गुंतवणूकदार सहज आकर्षित होत असतात. परंतु ऑप्शन ट्रेडिंगमधील धोके आणि मर्यादा यांच्याकडे बहुदा ते डोळेझाक होते. ऑप्शन ट्रेडिंग हे आर्थिक साधन ज्याप्रमाणे तुम्हाला जलद नफा मिळवून देऊ शकते आणि त्याचप्रमाणे वेगाने नुकसान देखील करू शकते.

    अनुभवी ट्रेडर्स हे प्रत्यक्ष ट्रेड घेण्यापूर्वी जोखीम निश्चिती कशी करतो, त्याचे विविध प्रकार काय असतात, याबाबत आपणांस खालीलप्रमाणे सखोल माहिती मिळते.

    मर्यादित जोखीम: अगदी मूलभूत संकल्पना जी ऑप्शन खरेदीदारांची नैसर्गिकपणे उपलब्ध असते, ती म्हणजे मर्यादित जोखीम. अर्थात ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ज्यावेळी तुम्ही कॉल किंवा पुट विकत घेता, त्यावेळी तुम्ही दिलेल्या प्रीमियम रकमेपेक्षा तुम्हाला जास्त नुकसान होऊ शकत नाही.

    नवीन ट्रेडर्स हे ऑप्शन ट्रेडिंग करताना लहान प्रीमियम असलेले कॉल किंवा पुट खरेदी करतात, सबब ते मोठ्या नुकसानीच्या भीतीशिवाय ट्रेड सुरु ठेऊ शकतात. ही संकल्पना नवीन ट्रेडर्सला जरी आकर्षित करणारी असली तरी, संपूर्ण प्रीमियम जोखमीच्या आधीन असतो.
    मर्यादित नफा आणि मर्यादित जोखीम: मर्यादित नफा आणि मर्यादित जोखीम असणारी तसेच सुरक्षित मानली जाणारी रणनीती म्हणजे स्प्रेड्स ही आहे. येथे संभाव्य नफा आणि जोखीम दोन्हीही पूर्वनियोजितपणे निश्चित करता येतात. यामध्ये बुल कॉल स्प्रेड आणि बियर पुट स्प्रेड हे दोन महत्वाचे घटक अंतर्भूत आहेत.

    एकाच वेळी ऑप्शनची खरेदी आणि वेगळ्या स्ट्राईक प्राईजच्या ऑप्शनची विक्री केली जाते. विशेषतः बाजाराची दिशा स्पष्ट नसताना किंवा बाजारामध्ये कमी अस्थिरता असताना ही रणनीती वापरली जाते. यामुळे ट्रेडर्सला त्याच्या ट्रेड मध्ये नफा आणि तोटा होण्याची शक्यता किती आहे याचा अंदाज ट्रेडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच येतो.
    जास्त नफा आणि मर्यादित जोखीम: जास्त नफा आणि मर्यादित जोखिमीसाठी ऑप्शन खरेदी करणे हे उत्तम उदाहरण होऊ शकते. बाजारामध्ये होणाऱ्या मोठ्या ब्रेकआउट्स किंवा महत्वाच्या घटनांवर आधारित या रणनीतीचा वापर केला जातो.

    जर बाजारामध्ये हा अपेक्षित हालचाल झाली तर तुमच्या ऑप्शन प्रीमियमची किंमत अनेक पटींनी वाढू शकते, आणि यावेळी तुमच्या नफ्याची क्षमता अमर्यादित राहते. परंतु बाजाराच्या अनपेक्षित हालचालीची किंमत म्हणून प्रीमियम शून्य होण्याचा धोका देखील असतो.
    बाजाराच्या दिशेवर आधारित जोखीम: ऑप्शन ट्रेडिंग मधील जोखीम ही सामान्यतः बाजाराच्या हालचालींवर अवलंबून असते. बाजारामध्ये अनपेक्षितपणे झालेली हालचाल जोखीम वाढवते, तर बाजारातील अपेक्षित हालचाल नफ्याची संधी निर्माण करते.

    या जोखमीचे नियोजन करण्यासाठी ट्रेडर्स हे हेजिंग किंवा स्टॉप लॉस सारख्या रणनीतीचा वापर करतात, ज्यामुळे अचानक होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासून भांडवल सुरक्षित राहते. यामुळे ट्रेडर्सने बाजाराच्या दिशेवर आधारित जोखीम ठरविण्याआधी बाजारातील इतर घटकांचा देखील अभ्यास करणे महत्वाचे असते.
    बाजाराच्या अस्थिरतेवर आधारित जोखीम: ऑप्शन ट्रेडिंग मध्ये बाजाराच्या दिशेबरोबरच गती देखील महत्वाची असते. यासाठी भारतीय शेअर बाजारामध्ये NSE मधील VIX अर्थात फियर इंडेक्स चा अभ्यास असणे महत्वाचे ठरते.

    बाजारामध्ये जर अस्थिरता गतिमान असेल तर ऑप्शन विक्रेत्यास नुकसान होऊ शकते, तसेच बाजारामध्ये जर अस्थिरता कमी असेल तर ऑप्शन खरेदीदारास नुकसान होऊ शकते. म्हणून अस्थिरतेचा अंदाज घेताना अपेक्षित बदल आणि वास्तविक बदल या घटकांवर ट्रेडर्सने विशेष लक्ष देणे आवश्यक ठरते.
    कालमर्यादेवर आधारित जोखीम: ऑप्शन प्रीमियम मध्ये जे वेळेचे मूल्य समाविष्ट असते त्याला थिटा किंवा थिटा डिके असे म्हणतात, ज्याचे थिटा नावाच्या ग्रीकने मोजमाप केले जाते. वेळ ही ऑप्शन बायर्स साठी शत्रूचे काम करते, जे बाजाराच्या मंद हालचालीसोबत प्रीमियम कमी करते, तर हीच वेळ ऑप्शन सेलर्स साठी मित्राचे काम करते, जे प्रीमियमच्या घसरणीमुळे फायदा देऊ शकते.

    ऑप्शन बायर्सने खरेदी केलेल्या ऑप्शन बाबत जरी बाजाराची दिशा योग्य असली तरीही ऑप्शनचे मूल्य वेळेच्या ओघात कमी होत जाते. तसेच ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी थिटा डिके चा वेग सर्वात जास्त असतो.

    जर बाजाराची दिशा अस्पष्ट असेल तर लांब कालावधीची एक्सपायरी असणारे ऑप्शन घेणे सोयीस्कर होईल. शक्यतो जवळची एक्सपायरी ऑप्शन बायर्सने टाळणे योग्य राहील. यामुळे ट्रेडिंग रणनीतीसाठी ट्रेडरला पुरेसा वेळ देखील मिळतो.
    ग्रीक्स आधारित जोखीम: ऑप्शनची किंमत फक्त स्टॉक किमतीवर अवलंबून नसते, तर ती ऑप्शन ग्रीक्सच्या घटकांवर देखील अवलंबून असते. हे ग्रीक्स ऑप्शन प्राईसवर होणाऱ्या लहानमोठ्या बदलांचे कारण स्पष्ट करतात. याबाबतची माहिती खालील टेबल मध्ये आपल्याला योग्य पद्धतीने मिळेल.
    ग्रीक मोजमापाची कार्यपद्धती
    डेल्टा स्टॉक प्राईस बदलल्यास ऑप्शन प्राईस किती बदलेल याचे मोजमाप करतो.
    गामा डेल्टा किती बदलेल याचे मोजमाप करतो.
    थिटा वेळ गेल्यामुळे ऑप्शन प्राईस किती कमी होईल याचे मोजमाप करतो.
    वेगा इम्प्लाईड व्हॉलीटिलिटीमुळे ऑप्शनच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलाचे मोजमाप करतो.

    ऑप्शन ट्रेडिंग हे भारतीय शेअर बाजारातील अत्यंत रोमांचक सेगमेंट आहे. परंतु येथे टिकून राहण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती पूर्वनियोजित जोखीम निश्चित करण्याची. केवळ बाजारातील संधी शोधणे पुरेसे होत नाही, तर याचसोबत तुमच्या भांडवलाचे संरक्षण करणे देखील महत्वाचे असते.

    तुम्ही आज जे ट्रेड केले होते त्यामध्ये तुमची पूर्वनियोजित जोखीम नक्की काय होती? कृपया आम्हाला संपर्क करून तुमचा अनुभव जरूर शेअर करा.

    आणखी पहा
    ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?
    ऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.

    पद्धतशीरपणे जोखीम कमी करण्यासाठी टिप्स

    stock-market-vs-stock-exchange

    Key Takeaways:

    • फक्त आत्मविश्वासाच्या जोरावर नव्हे तर खात्यातील शिल्लक आणि प्रति ट्रेड स्वीकृत असणारे नुकसान यावर आधारित पोझिशन सायझिंग ठेवणे योग्य आहे. कारण हाच तुमच्या बाजारामध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याचा परवाना असतो.
    • एकदा स्टॉप लॉस सेट केल्यानंतर त्यास सातत्याने बदलू नका, कारण संपत्तीची आशा करणे ही ट्रेडिंगमधील सर्वात धोकादायक भावना आहे.
    • ऑप्शन ग्रीक्स ची संवेदनशीलता वेळीच ओळखा, हे ग्रीक्स तुमच्या नफा आणि नुकसानीस कसे बदलतात याचे ज्ञान प्रत्येक ट्रेडरला असायलाच पाहिजे.

    शेअर बाजारातील तुमचा प्रवास नवीन असो वा अनुभवी, ट्रेडिंग करताना जोखीम कमी करणे सर्वांसाठी महत्त्वाचेच असते. परंतु अनपेक्षित चढ उतारांमुळे बाजारामध्ये पद्धतशीरपणे जोखीम कशी करावी? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे.

    शेअर बाजारामध्ये स्वतःच्या दैवावर विसंबून राहणे योग्य नाही, यासाठी योग्य रणनीती आणि शिस्तबद्ध दृष्टिकोन ठेऊनच ट्रेडिंग करावे लागेल. काही जोखीम व्यवस्थापन पद्धती प्रभावीपणे कशा वापरता येतील यासंबंधीची माहिती आपण पुढीलप्रमाणे घेऊ.

    1. भांडवलाचे शिस्तबद्ध विभाजन: जोखीम व्यवस्थापनासाठी भांडवलाचे योग्य विभाजन करणे ही प्राथमिक स्तरावरील बाब आहे. अर्थात तुमचे भांडवल विविध वर्गामध्ये विभाजित करा. यासाठी म्युच्युअल फंड्स, इक्विटी, सोने, बॉण्ड्स हे तुमच्यापुढे पर्याय आहेत.

      ठराविक फंड्स हे ठराविक वर्गासाठी विभाजित करण्याची शिस्त तुम्हाला आगामी काळातील मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते.
    2. पोजिशन साईझिंगसाठी पूर्व व्यवस्थापन: शेअर बाजारामध्ये मोठ्या स्वप्नासोबत मोठ्या पोझिशन्स घेणे तुमच्यासाठी नक्कीच हानिकारक ठरू शकते. तुमच्या प्रत्येक ट्रेड साठी रिस्क लिमिट सेट करा, ज्यामुळे ओव्हर ट्रेडिंग पासून बचाव होतो.
    3. स्टॉप लॉस आणि टाईम स्टॉप यांचा वापर: जर तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यापासून बाजूला राहायचे असेल तर स्टॉप लॉस ऑर्डर हा तुमचा सर्वात विश्वासू मित्र होऊ शकतो. यासोबतच तुमचा ट्रेड जर विशिष्ट कालावधीमध्ये फायद्यामध्ये जात नसेल तर अशा ट्रेड्स मधून बाहेर पडा. अगदी थोडाफार लॉस होत असेल तरीही असे ट्रेड जास्त वेळासाठी होल्ड करू नका.
    4. बाजारातील चढ उतारांचा अंदाज घेणे: भारतीय शेअर बाजारामध्ये India VIX हा इंडेक्स बाजारातील अपेक्षित अस्थिरता दाखवतो. या निर्देशांकाचा तुमच्या ट्रेड मध्ये वेळोवेळी उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला बाजाराच्या हालचालीची पातळी समजणे सोयीस्कर होईल.
    5. इव्हेन्ट ड्रिव्हन जोखिमीपासून अलिप्त राहणे: अचानक घडणाऱ्या घटना, त्यामध्ये निवडणुका व त्यांचे निकाल, बजेट, कंपन्यांचे तिमाही निकाल तसेच RBI चे व्याज दराबाबतचे निर्णय अशा घटनांनंतर बाजारामध्ये अस्थिरता वाढते. अशा वेळी तुमचा ट्रेड हा पूर्वनियोजित असायलाच हवा. यासाठी योग्य माहितीचा मागोवा घ्या आणि गुंतवणूक करताना अतिरिक्त सावधगिरी देखील बाळगा.
    6. ऑप्शन ग्रीक्सची संवेदनशीलता ओळखणे: विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ग्रीक्सची माहिती असणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे ऑप्शनच्या किमतीवर होणारा परिणाम तसेच वेळेनुसार घसरणारी किंमत यावर तुम्ही वेळोवेळी देखरेख करून ट्रेडींग निर्णय घेऊ शकता.
    7. बाजाराच्या दिशेवर डोळेझाकपणे विश्वास न ठेवणे: अनेक वेळा ट्रेडर्स हे त्यांच्या ट्रेड मध्ये एवढे गुंतून जातात की, बाजाराची दिशा स्पष्ट दिसत असताना देखील ते त्याकडे डोळेझाक करतात. यासाठी तुमच्याकडे मजबूत विश्लेषणाची रणनीती असणे आवश्यक आहे. यासोबतच योग्य रणनीती असूनही बाजार उलट दिशेने फिरल्यास बाजारातून बाहेर पडण्याची तुमच्याकडे मानसिकता देखील असायला हवी.
    8. भावनिक निर्णय टाळून पूर्वनियोजित प्रवास करणे: लोभ आणि भीती या बाबी शेअर बाजारामध्ये ट्रेडरचे नुकसान करू शकतात. भीतीपोटी ट्रेड मधून लवकर एक्सिट होणे, आणि लोभापायी नफा झालेला असताना देखील ट्रेड मधून बाहेर न पडण्याची मानसिकता तुम्हाला बदलावीच लागेल. ट्रेडिंग मध्ये तुमचा प्रवेश बिंदू, जोखीम क्षमता आणि एक्सिट प्लॅन तयार असणे गरजेचे आहे.

    शेअर बाजारामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर वरीलप्रमाणे नियमांचा नियमित सराव करा, जेणेकरून तुम्ही बाजारामध्ये टिकू शकाल. अन्यथा इतर ट्रेडर्स हे तुमच्या होणाऱ्या चुकांची वाट पाहत बसलेले असतात. तुम्ही तुमच्या पुढील ट्रेडिंग मध्ये वरीलपैकी कोणता नियम सर्वप्रथम आमलात आणणार? कृपया संपर्क पेज द्वारे आम्हाला नक्की सांगा.

    आणखी पहा
    ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?
    ऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.

    मार्केट स्थिर किंवा खाली जात असतानाही नफा कमावण्याची संधी.

    stock-market-vs-stock-exchange

    Key Takeaways:

    • शॉर्ट स्ट्रॅडल आणि शॉर्ट स्ट्रँगल सारख्या न्यूट्रल स्ट्रॅटेजीजचा वापर केल्याने, बाजारामध्ये मोठी हालचाल अपेक्षित नसताना देखील वेळ तुमच्या बाजूने काम करते, आणि नफा कमविण्यासाठी उत्तम संधी निर्माण होते.
    • आयर्न कॉन्डोर तसेच बटरफ्लाय स्प्रेड्स यासारख्या अत्याधुनिक रणनीती या तुमची जोखीम नियंत्रित ठेवतात, तसेच बाजाराच्या मंद हालचालींमधून देखील नफा मिळवून देतात.
    • बाजारातील तीव्र स्वरूपाची मंदी सुरु असताना पुट खरेदी केल्याने बाजाराच्या घसरणीपासून सुरक्षा होते, आणि हीच मंदी नफ्याच्या संधीमध्ये रूपांतरित होते.

    शेअर बाजारातील सातत्याने खाली येणाऱ्या लाल रंगाच्या कंडलस्टिक पाहून अनेकांच्या मनामध्ये विचार येत असेल, अशा परिस्थितीत मला नफा कसा होईल? किंवा या पडझडीचा मला फायदा घेता येऊ शकेल का?

    मनात येणाऱ्या या प्रश्नांचे उत्तर आहे, होय, हे पूर्णपणे शक्य आहे. फक्त बाजाराची दिशा वरील बाजूस असल्यानेच नाही तर खालील बाजूस असल्यावर देखील तुम्ही चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकता. यासाठी काही रणनीतीच्या पद्धती आहेत, ज्या तुमच्या ट्रेडची जोखीम नियंत्रित करून तुम्हाला नफा मिळवून देऊ शकतात.

    शॉर्ट स्ट्रॅडल आणि शॉर्ट स्ट्रँगल ची रणनीती

    जर तुम्हाला बाजाराच्या दिशेचा कोणताही अंदाज येत नाही, अथवा बाजारामध्ये अत्यंत कमी हालचाल होत आहे, अशा वेळी शॉर्ट स्ट्रॅडल आणि शॉर्ट स्ट्रँगल ची रणनीती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

    शॉर्ट स्ट्रॅडल: या रणनीतीमध्ये एकाच स्ट्राईक प्राईजवर आणि एकाच एक्सपायरी डेट साठी एक कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शनची विक्री करायची असते. यामुळे जरी मार्केटने कमी हालचाल केली तरी कॉल आणि पुट या दोन्हीमार्फत तुम्हाला प्रीमियमचा नफा कमवता येतो. तसेच बाजाराने अगदी तीव्र गतीने हालचाल केली तरी या रणनीतीमुळे नफा कमविण्याची शक्यता निर्माण होते.

    अर्थात होणारा नफा हा मर्यादित असू शकतो, परंतु हे जोखीम व्यवस्थापनाचे सर्वोत्तम उदाहरण देखील आहे.
    शॉर्ट स्ट्रँगल: ही रणनीती शॉर्ट स्ट्रॅडलपेक्षा थोडी सुरक्षित रणनीती समजली जाते. यामध्ये चालू स्ट्राईक प्राईज पेक्षा मोठ्या स्ट्राईक प्राईजवर कॉल ऑप्शनची विक्री केली जाते. आणि चालू स्ट्राईक प्राईज पेक्षा कमी स्ट्राईक प्राईजवर पुट ऑप्शनची विक्री केली जाते.

    यामुळे अशा प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये नफ्याचा झोन तयार होतो. या नफ्याच्या झोन दरम्यान जर बाजार राहिला तर तुम्हाला नफा होतो. तसेच तोट्याच्या परिस्थितीत तोटा कमी प्रमाणात होतो.

    वरील दोन्ही रणनीती मध्ये वेळेच्या क्षयाचा फायदा होतो.

    आयर्न कॉन्डोर आणि बटरफ्लाय स्प्रेड्स

    जर तुम्हाला निश्चित आणि मर्यादित तोट्याची जोखीम घेयची असेल तर आयर्न कॉन्डोर आणि बटरफ्लाय स्प्रेड्स तुम्हाला फायदेशीर ठरतील. अर्थात या रणनीती म्हणजे एक प्रकारची प्रीडिफाइन्ड रिस्क स्ट्रॅटेजी असे देखील म्हणता येईल.

    आयर्न कॉन्डोर: या रणनीतीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येते. बाजार एका विशिष्ट रेंज मध्ये राहील असे जेंव्हा तुम्हाला वाटते, आणि तुम्हाला जास्त प्रमाणात जोखीम घेणे देखील टाळायचे असते. अशा वेळी ही रणनीती अत्यंत उपयुक्त ठरते.

    या रणनीतीमध्ये खालीलप्रमाणे चार ऑपशन्स ट्रेडचा समावेश होतो.
    1. आऊट ऑफ दि मनी (OTM): पुट विक्री करणे.
    2. आऊट ऑफ दि मनी (OTM): पुट खरेदी करणे.
    3. आऊट ऑफ दि मनी (OTM): कॉल विक्री करणे.
    4. आऊट ऑफ दि मनी (OTM): कॉल खरेदी करणे.
    या रणनीतीमध्ये तुम्ही एका प्रकारे शॉर्ट स्ट्रॅडल आणि शॉर्ट स्ट्रँगलचा इन्शुरन्स घेत आहेत. यामध्ये जरी नफा कमी होत असला तरी तोटा देखील मर्यादितच असतो.
    शॉर्ट स्ट्रँगल: ही रणनीती शॉर्ट स्ट्रॅडलपेक्षा थोडी सुरक्षित रणनीती समजली जाते. यामध्ये चालू स्ट्राईक प्राईज पेक्षा मोठ्या स्ट्राईक प्राईजवर कॉल ऑप्शनची विक्री केली जाते. आणि चालू स्ट्राईक प्राईज पेक्षा कमी स्ट्राईक प्राईजवर पुट ऑप्शनची विक्री केली जाते.

    यामुळे अशा प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये नफ्याचा झोन तयार होतो. या नफ्याच्या झोन दरम्यान जर बाजार राहिला तर तुम्हाला नफा होतो. तसेच तोट्याच्या परिस्थितीत तोटा कमी प्रमाणात होतो.

    वरील दोन्ही रणनीती मध्ये वेळेच्या क्षयाचा फायदा होतो.
    बटरफ्लाय स्प्रेड: ही रणनीती काहीशी आयर्न कॉन्डोरसारखीच आहे. ही रणनीती फक्त एकाच दिशेसाठी तयार केली जाते, अर्थात केवळ कॉल किंवा केवळ पुट साठी. या रणनीती मध्ये देखील कमी नफा परंतु कमी तोटा असतो.

    जर बाजार एखाद्या निश्चित स्ट्राईक प्राईजवर एक्सपायर होईल असे तुम्हाला वाटत असेल तर ही रणनीती थोड्या गुंतवणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवून देऊ शकते. अशा प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये नफ्याचा झोन तयार होतो. या नफ्याच्या झोन दरम्यान जर बाजार राहिला तर तुम्हाला नफा होतो. तसेच तोट्याच्या परिस्थितीत तोटा कमी प्रमाणात होतो.

    टाइम डिकेचा फायदा

    टाईम डिके, हा ऑप्शन ट्रेडिंग मधील सर्वात महत्वाचा घटक आहे, जो वेळेनुसार प्रीमियम कमी करतो. अगदी बाजार स्थिर असेल तरीही फक्त वेळ जात असल्याने ऑप्शन स्वस्त होत जातात. याचा फायदा ऑप्शन विक्रेत्यास होऊ शकतो, परंतु ऑप्शन खरेदीदारास टाईम डिकेचा धोका नेहमीच राहतो. तुमच्या ट्रेडिंगमध्ये जर योग्य रणनीतीचा वापर केला तरच तुम्ही फायदेशीर राहाल.

    पुट ऑप्शन्स खरेदी

    बाजार खाली जात असताना वापरली जाणारी सर्वात थेट रणनीती म्हणजे पुट ऑप्शन खरेदी. अशी केलेली खरेदी तुम्ही एक्सपायरी संपण्याआधी ठराविक किमतीला विक्री करू शकता. यामध्ये तुम्ही दिलेल्या प्रीमियम एवढी जोखीम आणि अमर्यादित नफा असतो.

    बीयर पुट स्प्रेड

    बाजार कोसळेल परंतु जास्त नाही, असे जेंव्हा तुम्हाला वाटते त्यावेळी बीयर पुट स्प्रेड रणनीती उपयुक्त ठरते. यामध्ये जास्त स्ट्राईक प्राईज असलेला पुट खरेदी केला जातो, आणि कमी स्ट्राईक प्राईज असलेला पुट विक्री केला जातो. या रणनीती मध्ये नफा आणि तोटा हे दोन्ही घटक मर्यादित राहतात.

    कव्हर केलेले पुट

    दीर्घकालीन गुंतवणुकीची इच्छा असलेला शेअर ज्या किमतीला तुम्ही विकत घेण्यास तयार आहेत, ती किंमत ठरवून त्या शेअरवर पुट ऑप्शनची विक्री करणे. ही आहे कव्हर्ड पुट रणनीती. अर्थात ही रणनीती समजायला थोडी कठीण आणि वेगळ्या स्वरूपाची आहे. परंतु या रणनीती द्वारे चांगला नफा कमवता येऊ शकतो. SstocksS या आमच्या वेबसाईट मध्ये कव्हर्ड पुट बद्दल आम्ही सविस्तर आणि मुद्देसूद विवेचन केलेले आहे.

    आणखी पहा
    ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?
    ऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.

    स्टॉप लॉस ऑर्डरसाठी इतर आकर्षक पर्याय

    stock-market-vs-stock-exchange

    Key Takeaways:

    • केवळ एकाच किमतीवर अवलंबून न राहता, ट्रेलिंग स्टॉप लॉस किंवा स्टॉप लिमिट ऑर्डर यांसारख्या रणनीतीचा वापर केल्यास अस्थिर बाजारामध्ये लवचिक राहणे सोयीस्कर होईल, आणि अनपेक्षित मंदीपासून संरक्षण देखील होईल.
    • बाजारातील चढ आणि उतारांपेक्षा देखील भावनिक चढ उतार हे बेशिस्तपणे ट्रेडिंगच्या जाळ्यात ओढतात, परिणामी नियोजित स्तरावर एक्सिट न झाल्यास मोठे नुकसान देखील होऊ शकते.
    • नियोजित वेळेमध्ये नफा न झाल्यास किंवा अपेक्षित किंमत न वाढल्यास टाईम बेस्ड एक्सिट या रणनीतीचा वापर करावा. जेणेकरून आपले भांडवल अन्य संधीसाठी सज्ज ठेवता येईल.

    अनेक वेळा तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर लावल्यानंतर नेमका तोच पॉईंट मार्केट द्वारे हिट होतो, यावेळी तुमची पोझिशन लॉस मध्ये कट झाल्यानंतर मार्केट अपेक्षित दिशेने वाढत जाते. हा अनुभव जवळजवळ प्रत्येक ट्रेडर्सला वारंवार येत असतो.

    अशा कारणाने फक्त स्टॉप लॉस ऑर्डरवर अवलंबून राहण्याने ट्रेडरला पुरेशी सुरक्षा मिळत नाही. यामागे एक प्रमुख कारण म्हणजे ट्रेडर्सचा स्टॉप लॉस वरील अति विश्वास आणि योग्य जोखीम व्यवस्थापनाचा अभाव हे देखील आहे.

    ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सातत्याने सक्रिय असणाऱ्या ट्रेडर्सला हे माहिती असते की, केवळ नफा कमविणे नाही तर भांडवलाची सुरक्षा देखील येथे अत्यंत महत्वाची असते. यासाठी असे ट्रेडर्स स्टॉप लॉस ऐवजी अन्य आकर्षक पर्यायांची निवड करतात.

    1. ट्रेलिंग स्टॉप लॉस: स्टॉप लॉस हा फक्त तोटा थांबविण्यासाठी नसतो तर तो मिळालेल्या नफ्याचे संरक्षण करण्यासाठी देखील वापरला जातो. ट्रेलिंग स्टॉप लॉस हा पर्याय तुम्हाला मार्केट मधील मोठ्या रॅलीमध्ये फायदा मिळवून देण्यासाठी मदत करतो. तसेच अशा वेळी जर मार्केटने अनपेक्षितपणे दिशा बदलली तर तुमच्या नफ्याचे रक्षण देखील करतो.
    2. मॅन्युअल किंवा मानसिक स्टॉप लॉस: रिटेल ट्रेडर्सचे स्टॉप लॉस ज्या पॉईंट्स वर आहे त्या ठिकाणी संस्थात्मक गुंतवणूकदार मार्केटला घेऊन जातात आणि लिक्विडीटी तयार करतात. या प्रकारास स्टॉप लॉस हंटिंग असे म्हणतात. या प्रकारामध्ये अत्यंत शिस्तबद्ध ट्रेडिंग करण्याची गरज असते. मार्केट वेगाने ढासळले तर मॅन्युअल पद्धतीने पोझिशन कट करणे योग्य राहते. तसेच मार्केट पुन्हा अपेक्षित दिशेने वाढेल अशी अशा धरून होल्डिंग केले तर ट्रेडर्सचे मोठे नुकसान देखील होऊ शकते.
    3. स्टॉप लिमिट ऑर्डर: या ऑर्डर प्रकारामध्ये ज्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये तुम्हाला ट्रेड मधून एक्सिट होयचे नाही अशी लिमिट लावली जाते. यामुळे तुमची पोझिशन कमी भावामध्ये विक्री होण्यापासून संरक्षण होते.
    4. प्रोटेक्टिव्ह पुट: ज्यावेळी तुम्ही स्टॉक किंवा फ्युचर खरेदी करता, त्यावेळी मार्केट वरील दिशेने जाणे अपेक्षित असते. परंतु जर अनपेक्षितपणे मार्केट पडल्यास अशावेळी तुम्हाला नुकसान सहन करावे लागते. हे टाळण्यासाठी तुम्हाला त्या स्टॉकचा पुट ऑप्शन खरेदी करावा लागेल. पुट ऑप्शनचे वैशिष्ट्य असे आहे की, ज्यावेळी मार्केट पडते त्यावेळी पुटची किंमत वाढते. अर्थात शेअरमध्ये जरी तोटा झाला तरी पुट ऑप्शनमध्ये नफा होईल. हा तुमच्या ट्रेडिंगचा एक प्रकारचा इन्शुरन्सच असतो.
    5. कॉलर स्ट्रॅटेजी: यशस्वी ट्रेडर्स हे प्रोटेक्टिव्ह पुट प्रीमियम साठी होणारा खर्च वाचविण्यासाठी कॉलर रणनीतीसारख्या पर्यायाची निवड करतात. यामध्ये पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या स्टॉकच्या सुरक्षेसाठी पुट ऑप्शन खरेदी केला जातो. तसेच हा खर्च भरून काढण्यासाठी वरच्या स्ट्राईकचा कॉल ऑप्शन विक्री केला जातो. परिणामी नफा एका मर्यादेपर्यंतच होतो. परंतु कमी रिस्क मध्ये नफा कमविण्याची ही सर्वोत्तम रणनीती आहे.
    6. मॅरीड पुट: प्रोटेक्टिव्ह पुट तुम्ही कधीही घेऊ शकता, अगदी स्टॉक घेतल्यानंतर काही दिवसांनी घेतला तरीही चालते. परंतु मॅरीड पुट या रणनीतीमध्ये स्टॉक आणि पुट ऑप्शन हे एकाच वेळी तसेच एकाच ट्रेडचा भाग म्हणून घेतला जातो. यामुळे ट्रेडरला त्याच्या ट्रेडची सर्वाधिक जोखीम किती आहे हे आधीपासूनच माहिती असते. अगदी जागतिक स्तरावर होणाऱ्या घटनांमुळे जरी मार्केट पडले तरीही पुट ऑप्शन हा भांडवलाची सुरक्षा करत असतो.
    7. पोझिशन साईझिंग: अनेक ट्रेडर्स हे केवळ एंट्री आणि एक्सिट वर लक्ष देतात, परंतु पोझिशन सायझिंगचा कोणताही विचार करत नाहीत. अर्थात योग्य पोझिशन सायझिंग असल्यास स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर भांडवलावर जास्त परिणाम होत नाही. प्रभावी जोखीम व्यवस्थापन पद्धतीची माहिती प्रत्येक ट्रेडरला असणे गरजेचेच आहे, यामुळे अधिक अचूक निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढतो.
    8. टाईम बेस्ड एक्सिट: ऑप्शन ट्रेडिंग मध्ये सक्रिय असणाऱ्या ट्रेडर्सना माहिती असते की, वेळ हाच पैसा आहे. कारण येथे थिटा डिके मुळे वेळेनुसार प्रीमियम कमी होत जाते. यासाठी ट्रेडर्सने वेळेची मर्यादा पाळणे आवश्यक होऊन जाते. जसे की, जर पुढील 2 तासात मार्केट 20 पॉईंट्स ने वाढले नाही तर ट्रेड मधून बाहेर पडणे, मग नफा होऊ किंवा तोटा.

    वरीलप्रमाणे दिलेले 8 पर्याय हे केवळ तुमचे नुकसान थांबवत नाहीत तर तुम्हाला प्रभावी जोखीम व्यवस्थापनाची रणनीती देखील शिकवतात. यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस, प्रोटेक्टिव्ह पुट, मॅरीड पुट, पोझिशन सायझिंग यासारख्या पर्यायांचा वापर स्वतःच्या क्षमतेनुसार आणि वेळेप्रमाणे करायला हवा.

    जर तुम्ही भांडवलाचे रक्षण केले तरच मार्केट मध्ये तुम्हाला पुन्हा संधी मिळेल हे जरूर लक्षात ठेवा. तुम्ही तुमचे भांडवल शून्य होऊ नये यासाठी कोणता प्लॅन तयार केला आहे? कृपया आम्हाला आवश्य सांगा.

    आणखी पहा
    ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?
    ऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.

    स्टॉप लॉसचे धोके Vs इतर पर्याय वापरण्याचे फायदे

    stock-market-vs-stock-exchange

    Key Takeaways:

    • केवळ पारंपरिक स्टॉप लॉस रणनीतीवर अवलंबून न राहता प्रत्येकाने स्ट्रक्चरल रिस्क मॅनेजमेंटचे महत्व समजावून घेतलेच पाहिजे, कारण फक्त एकाच पॉइंटवर अवलंबून राहणे म्हणजे स्वतःहून स्टॉप लॉस हंटिंग साठी आमंत्रण देणे होय.
    • फक्त प्राईस पॉइंटवर लक्ष केंद्रित न करता, बाजारामध्ये वेळोवेळी बदलणाऱ्या रचनात्मक जोखीम व्यवस्थापनाचा वापर करून बाजारातील अनपेक्षित हालचालींवर मात करणे आवश्यक आहे.
    • स्टॉप लॉस ऐवजी इतर पर्यायांचा वापर करणे म्हणजे केवळ जोखीम नियंत्रित करणे नाही, तर उत्पन्नाच्या अतिरिक्त संधी निर्माण करणे देखील आहे.

    अनेकदा खूप मेहनत घेऊन एखादी परफेक्ट स्टॉप लॉस लेव्हल ठरविली जाते आणि प्रत्यक्ष ट्रेड करताना तुम्हाला स्टॉप लॉस हंटिंग या प्रकारचा सामना करावा लागतो. केवळ पारंपरिक स्टॉप लॉस रणनीतीवरच अवलंबून राहणे नक्कीच योग्य नाही. कारण ट्रेडिंग मध्ये आता स्मार्ट रणनीतींचा अधिकाधिक वापर केला जात आहे.

    आजच्या युगातील स्मार्ट ट्रेडर्स हे केवळ एकाच प्राईस पॉईंट्स सोबत न राहता ते डायनॅमिक आणि स्ट्रक्चरल रिस्क मॅनेजमेंटचा सर्रास वापर करत आहेत. स्टॉप लॉस ऐवजी इतर प्रगत पर्याय वापरणे का आवश्यक आहे हे तुम्हाला खालील टेबल द्वारे अधिक स्पष्टपणे समजू शकते.

    घटक पारंपरिक स्टॉप लॉसची जोखीम इतर पर्यायांचे फायदे
    ऑपरेटर ट्रॅप ऑपरेटर्स हे सिस्टीम मधील ऑर्डर्स पाहू शकतात, यामुळे स्टॉप लॉस हंटिंगचा धोका निर्माण होऊ शकतो. तुम्ही केलेले हेजिंग आणि मानसिक रणनीती कोणीही पाहू शकत नाही, सबब तुम्हाला टार्गेट करणे शक्य होत नाही.
    गॅप ओपनिंग रणनीतीतील जोखीम दुसऱ्या दिवशी मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन झाले तर स्टॉप लॉस पॉईंट काम करत नाही, यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. प्रोटेक्टिव्ह कॉल, प्रोटेक्टिव्ह पुट किंवा हेजिंग हे पर्याय गॅप ओपनिंग मध्ये भांडवल सुरक्षित ठेवतात.
    बाजारातील चढ उतार बाजारामधील थोड्या चढ उतारामुळे स्टॉप लॉस हिट होऊन नुकसान होऊ शकते. स्प्रेड्स सारख्या इतर पर्यायांमुळे बाजारातील लहान चढ उतार हे तुमच्या पोझिशनवर तात्काळ परिणाम करत नाहीत.
    मानसिक तणाव स्टॉप लॉस जवळ मार्केट प्राईज आल्यावर मानसिक तणाव वाढून पॅनिक सेलिंग होऊ शकते. मॅरीड पुट सारखे रिस्क कव्हर असल्याने कोणताही मानसिक तणाव न घेता ट्रेड होल्ड करता येतो.
    ट्रेड ॲडजस्टमेंट ज्यावेळी स्टॉप लॉस हिट होईल, त्यावेळी ट्रेड मधून बाहेर पडावे लागते. ट्रेड अपेक्षित दिशेने न गेल्यास तो ऑप्शन सेलिंग आणि यासारख्या अन्य पर्यायाने दुरुस्त करता येणे शक्य आहे.
    वेळेची जोखीम मार्केटची हालचाल शांत झाली आणि स्टॉप लॉस हिट झाला नाही तरीही जोखीम वाढते. टाईम बेस्ड एक्सिट ची रणनीती वापरल्यास जोखीम अधिक पटीने कमी होते.

    स्टॉप लॉस हा बाजारामध्ये घडणाऱ्या अनपेक्षित घटनांपासून सुरक्षा देणारे कवच आहे. परंतु स्टॉप लॉस व्यतिरिक्त जोखीम कमी करणारे इतर पर्याय जसे की, हेजिंग, मॅरीड पुट, स्प्रेड्स हे पर्याय ट्रेड व्यवस्थापनासाठी नक्कीच अधिक प्रभावी ठरू शकतात.

    परंतु असे असले तरीही स्टॉप लॉस रणनीतीला कधीही कमी समजण्याची चूक करू नका, आणि तुमच्या ट्रेडसाठी कोणती रणनीती योग्य आहे? याबाबत आम्हाला आवश्य सांगा.

    आणखी पहा
    ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?
    ऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.

    महत्त्वाचे निष्कर्ष

    शेअर बाजारामधील ऑप्शन ट्रेडिंग हे एक आकर्षक परंतु जटिल स्वरूपाचे साधन आहे. आम्ही या लेखामध्ये स्पष्ट केले आहे की, योग्य ज्ञान आणि प्लॅन यांची व्यवस्थापन कला ही ऑप्शन ट्रेडींगला जुगार या संकल्पनेतून बाहेर काढते.

    बाजारातील चढ आणि उतार यांच्या खेळामध्ये काही वेळा स्टॉप लॉस पेक्षाही अधिक लवचिक जोखीम व्यवस्थापन प्रणालीची गरज भासते. यासाठी आम्ही या लेखामध्ये इतर पर्यायांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    ट्रेडिंग मध्ये पारंपरिक जोखीम व्यवस्थापन प्रणालीसोबतच आधुनिक आणि स्मार्ट पद्धतीचे जोखीम व्यवस्थापन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. अर्थात ट्रेडिंग मध्ये भांडवल रक्षणासाठी कौशल्य विकसित करणे ही आजच्या काळाची गरजच बनलेली आहे.

    पुढचं पाऊल: ऑप्शन ट्रेडिंग एक शक्तिशाली रणनीती.

    ऑप्शन ट्रेडिंग मध्ये धोका हा अनियंत्रित आणि अनियोजित रणनीतीच्या वापराचा आहे. पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापन, ग्रीक्स आणि हेजिंग सारख्या प्रभावी रणनीतींद्वारे तुमच्या ट्रेडिंगची रचना अधिक मजबूत देखील बनवू शकता.

    सातत्याने किमतीमध्ये चढ आणि उतार करणे हा बाजाराचा नैसर्गिक स्वभाव आहे. या स्वभावास धोकादायक न मानता स्प्रेड्स आणि हेजिंग सारख्या रणनीतीने कमी जोखीम आणि मर्यादित नफ्याचे सूत्र यशस्वीपणे वापरता येते.

    प्रत्येक यश हे पूर्वनियोजित रणनीतीचा निकाल असतो, तर अपयश हे व्यवस्थापनाशिवाय केलेल्या कामाचा परिणाम असते. म्हणून लक्षात ठेवा की, तुमचे अपयश हे यशामध्ये बदलण्याची शक्ती केवळ आणि केवळ उत्कृष्ट व्यवस्थापनातच आहे.

    यासाठी ऑप्शन्स द्वारे तुम्ही व्यवस्थापित करू इच्छित असलेली प्रमुख मानसिक आणि भावनिक चाचणी ( उदा. भीती, लोभ, बेपर्वाई ) कोणती आहे? कृपया याचे उत्तर तुम्ही या लेखामध्ये नक्की शोधा.

    People Also Ask

    ➕ ऑप्शन ट्रेडिंग हे धोकादायक मानले जाण्यामागील सामान्य गैरसमज कोणता आहे?
    ➕ पूर्वनियोजित जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय?
    ➕ बाजार अत्यंत कमी किंवा मंदपणे हालचाल करत असताना नफा कमविण्यासाठी कोणती रणनीती वापरली जाऊ शकते?
    ➕ पारंपरिक स्टॉप लॉस पेक्षा देखील ट्रेलिंग स्टॉप लॉसचा अधिक फायदा काय आहे?
    ➕ पारंपरिक स्टॉप लॉस वापरल्याने होणारे प्रमुख दोन धोके कोणते आहेत?

    महत्वाचे अस्वीकरण (Disclaimer):

    शेअर बाजार आणि विशेषतः ऑप्शन ट्रेडिंग हे अत्यंत उच्च जोखमीचे आणि गुंतागुंतीचे क्षेत्र आहे. या बाजारामध्ये तुमचे संपूर्ण भांडवल गमावण्याचा धोका नेहमीच असतो.

    या लेखामध्ये दिलेली सर्व माहिती, उदाहरणे आणि रणनीती केवळ शैक्षणिक आणि माहितीच्या उद्देशाने तयार केलेली आहे. ती कोणत्याही परिस्थितीत आर्थिक सल्ला किंवा गुंतवणुकीची शिफारस मानली जाऊ नये. बाजारातील मागील कामगिरी भविष्यातील नफ्याची कोणतीही हमी देत नाही.

    बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या आर्थिक सल्लागाराचा किंवा SEBI नोंदणीकृत तज्ञाचा सल्ला घ्यावा. तसेच स्वतःच्या सखोल संशोधनाच्या आधारे गुंतवणूक करावी.

    लेखातील माहितीच्या आधारावर घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आणि त्यातून होणाऱ्या नफा किंवा नुकसानीसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार असाल. यासाठी गुंतवणूक कृपया विचारपूर्वक, शिस्तबद्ध आणि जोखीम व्यवस्थापनाच्या कठोर नियमांनुसारच ट्रेडिंग करावी.
    AdMob Advertisement Space
    Home Articles Ideas Analyzer Contact Us